बजाज कुटुंबीयांचे योगदान अविस्मरणीय : जेटली 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

मुंबई : महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीसाठी समाजातील सर्व स्तरांतील वर्गाला अशा प्रकारे प्रेरित केले होते की, प्रत्येक जण या चळवळीशी समरस झाला होता. उद्योगपतीही या चळवळीत उतरले होते. बजाज कुटुंबातील अनेक जण स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले होते. अशी कुटुंबे अपवादानेच आढळतील, असे गौरवोद्‌गार केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट कार्यमंत्री अरुण जेटली यांनी जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यात काढले. 

बजाज फाऊंडेशनच्या शनिवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात मानवतावाद आणि समाजकार्याच्या क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या चार जणांचा गौरव करण्यात आला. या वेळी अध्यक्ष राहुल बजाज, फाऊंडेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष व माजी न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी उपस्थित होते. 

राजस्थानातील ग्रामीण विकास विज्ञान समितीचे सचिव शशी त्यागी, छत्तीसगडमधील जन स्वास्थ्य सहयोग संस्थेचे डॉ. प्रवीण नायर, डॉ. झियाद मेदुख आणि पॅलेस्टाईनमधील अल-अक्‍सा विद्यापीठाच्या फ्रेंच विभागाचे संचालक गाझा यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Arun Jaitley