राज ठाकरे हे भाजपने उभे केलेले बाहुले : काँग्रेसचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

भाजप हा माजलेला हत्ती आहे. त्याला ताळ्यावर आणण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे मनसे, आरपीआय अशा पक्षांच्या नादी जनतेने लागू नये. काँग्रेसला बळकट करून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मदत करावी

मुंबई : गेली काही वर्षे झोपी गेलेले राज ठाकरे आता अचानक जागे झाले आहेत. यामागे भाजपची खेळी आहे. राज ठाकरे मोठे झाले तर ते शिवसेनेची मते खातील. त्यामुळे शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी भाजपने राज ठाकरेंना पुढे केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते डाॅ. राजू वाघमारे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केला.

राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत. यापुर्वी त्यांनी मोदी व भाजपचे अनेकदा उघडपणे समर्थन केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांनी मोदी यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपच्या हातचे बाहुले आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. दुस-या बाजूला शिवसेना भाजपसाठी डेईजड होत चालली आहे.

शिवसेनेला अडचणीत आणण्याची संधी भाजप सोडत नाही. म्हणूनच शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने राज ठाकरेंचा वापर करण्यास सुरूवात केल्याची शक्यता डाॅ. वाघमारे यांनी व्यक्त केली. 

भाजप हा माजलेला हत्ती आहे. त्याला ताळ्यावर आणण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे मनसे, आरपीआय अशा पक्षांच्या नादी जनतेने लागू नये. काँग्रेसला बळकट करून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मदत करावी, असेही डाॅ. वाघमारे म्हणाले.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Elphinstone Mumbai Stampede Raj Thackray Congress BJP