बनावट कागदपत्रांद्वारे दुबईत जाणारे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे दुबईला नोकरीकरिता जाणाऱ्या तिघांना सहार पोलिसांनी अटक केली. अजितकुमार विश्‍वनाथ चौहान, संदीप दुधनाथ गुप्ता आणि संदीप राजेंद्र चौहान अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यातील एका फरारी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. 

मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले तिघेही दुबईला नोकरीकरिता निघाले होते. त्यांना फरारी आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करून दिली. दोन दिवसांपूर्वी हे तिघे मुंबईला आले. शुक्रवारी (ता. 12) ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचले आणि रात्री ते दुबईला जाणार होते. विमानतळावर ते संशयास्पदरीत्या फिरताना आढळले.

चेकिंग एरिया परिसरात विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे संशयास्पद वाटली. पासपोर्टबाबत विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दुबई विमानतळ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्या वेळी तिघांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. विमानतळ अधिकाऱ्यांनी याची माहिती सहार पोलिसांना दिली.

Web Title: marathi news marathi websites Mumbai news mumbai crime news