भाजपच्या नावात हिंदुस्थान नाही! 

भाजपच्या नावात हिंदुस्थान नाही! 

मुंबई : भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा आरोप होत असला तरी त्यांनी 'हिंदुस्थान जनता पक्ष' असे पक्षाचे नाव ठेवलेले नाही, तर भारतीय जनता पक्ष असे नाव आहे. विविध जातीधर्मांचे लोक या देशात राहत असल्याने आपल्या देशाचा उल्लेख 'हिंदुस्थान' असा करू नये, तर भारत असेच म्हटले पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

मुलुंड पूर्व येथे आमदार सरदार तारासिंग यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या उद्यानात भगवान गौतम बुद्ध आणि संत थिरुवल्लूवर यांच्या पुतळ्यांचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार किरीट सोमय्या, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, संयोजक डॉ. वरदाराजन, डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या संचालक योजना ठोकळे, रिपब्लिकन पक्षाचे काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी पत्रकार जगन्नाथ मोरे यांच्या साप्ताहिक 'निर्भीड'च्या दिवाळी अंकाचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांना सोबत घेऊन विकास करत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून 'भारत' असा उल्लेख करणेच योग्य आहे. ही राष्ट्रीय एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळेच शक्‍य झाली आहे. एकमेकांच्या धर्मांचा आदर करून आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आठवले यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com