ठाण्यात आणखी 1 कोटी 98 लाखांच्या नोटा हस्तगत

श्रीकांत सावंत
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

ठाणे : चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशेच्या सुमारे 1 कोटी 98 लाख रुपयांच्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्यासाठी आलेल्या चार जणांना ठाणे पोलीसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास घेवारे यांना खबऱ्याकडून जुन्या नोटा बदलण्यासाठी काही व्यक्ती पलावा सिटी डोंबिवली येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री पलावा सिटी येथील लक्ष्मी हॉटेल समोरील परिसरात सापळा रचला होता.

त्यावेळी चार जण सफेद रंगाच्या स्कोडा कार मधून आले. या संशयित चार जणांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता कारच्या डिकी मध्ये 1 हजाराच्या चालनातून रद्द झालेल्या 19 हजार 691 आणि 500 च्या 268 जुन्या नोटा आढळून आल्या. 1 कोटी 98 लाख 25 हजार रुपये किमतीच्या या नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. तर अजित माधवराव सुर्वे (57, हनुमान नगर डोंबिवली), रवींद्र भास्कर चौधरी ( 34, लालचौकी कल्याण), पदमसिंग प्रेमसिंग बिष्ट ( 27, नेरुळ, नवी मुंबई), प्रकाश उर्फ सुनील कौतिक पाटील (34, उल्हासनगर) या नोटा बदली करण्यासाठी आलेल्या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील स्कोडा कार देखील जप्त केली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे व त्यांच्या पथकाने केली. सोमवारी गुन्हे शाखा एकच्या पथकाने ठाण्यात दीड कोटी हस्तगत केले होते.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Thane News Fake currency