28 डिसेंबरच्या महासभेत विनाशकारी डीपी वरून हंगामा

28 डिसेंबरच्या महासभेत विनाशकारी डीपी वरून हंगामा

उल्हासनगर : गेल्या 40,50  वर्षांपासून आपण ज्या उल्हासनगरात राहतो, त्या शहरातून विनाशकारी विकास आराखड्यातील यमदूतरुपी रिंगरूट, रोडच्या रुंदीकारणा सोबत वसाहतींवर लादलेल्या आरक्षणाच्या बुलडोझर खाली आपला संसार चिरडला जाणार, अशा एकच भीतीने शहरातील प्रत्येक नागरिक भयभीत झालेला आहे. या आराखड्याच्या विरोधात विविध वॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेले असून त्यात सर्वत्र विरोधाचा सूर उमटू लागला आहे. जनमताचा हा विरोध पाहता 25 तारखेला सांताक्लॉज डीपीची होळी करणार येत्या 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत विनाशकारी डीपी हंगामा होणार असून डीपीच हटाओचा नारा गुंजणार असे चित्र दिसू लागले आहे.

2013 मध्ये सिंगापूरच्या धर्तीवरील क्लस्टर प्लॅन नुसार राज्यशासनाने उल्हासनगरचा तब्बल 43 वर्षानंतर नवा विकास आराखडा अमलात आणला. या आराखड्यातहि विनाश असल्याने अनेक महासभेत त्याचा विरोध झाला होता. आलेल्या सूचना हरकती गृहीत धरून आणि त्यात 107 बदल करून या आराखड्याला मंजुरीसाठी शासनदरबारी दरबारी पाठवले होते. मात्र 'चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर होऊन आलेला हा आराखडा पूर्णतः विनाशकारी आहे. चार वर्षे मंजुरीसाठी लावलेला हा आराखडा चार भिंतीच्या आत बसून आणि बिल्डर, भूमाफियांना हाताशी धरून बिल्डरधार्जिना बनवताना मध्यमवर्गीय, गोरगरीब यांच्या संसारावर नांगर फिरवणारा आहे. हा डेव्हलपमेंट नसून डिस्ट्रॉय करणारा आराखडा आहे', असा आरोप शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,आमदार डॉ.बालाजी किणीकर, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी केला. मनसेचे संजय घुगे, प्रदिप गोडसे, दिलीप थोरात, बंडू देशमुख, मनोज शेलार, मैनुद्दीन शेख, सचिन बेंडके, मुकेश सेटपलानी आदींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात डीपीची होळी करून आंदोलनाचा बिगुल वाजवलेला आहे.

मागच्या महासभेतच नगरसेविका जोत्स्ना जाधव यांनी ठिय्या आंदोलन करून आणखीन कितीदा रॉड रुंदीकारणाच्या मार्किंग करून नागरिकांना घाबरवणार?असा सवाल केला नगरसेवक प्रमोद टाले,नगरसेविका अंजली साळवे,कविता बागुल यांनी रोडच्या रुंदीकारणा मागे बिल्डरांच्या राजकारणाचा आरोप केलेला आहे.समाजसेवक शिवाजी रगडे,महादेव सोनावणे व्यापारी जगदीश तेजवानी,महेश मिरानी,परमानंद गेरेजा आदींच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांचा मोर्चा पालिकेवर धडकून गेलेला आहे.आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात याच विनाशकारी डीपीच्या विरोधात अनेक आमदारांच्या आणि उल्हासनगरातील राजेंद्र चौधरी,भगवान भालेराव,प्रमोद टाले,किरण सोनावणे,राजू गायकवाड यांच्या उपस्थितीत आंदोलन केले आहे.अधिवेशनातच आमदार ज्योती कालानी यांनी हा डीपी विनाशकारी कसा हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.रिपाइं आठवले गटाचे प्रदेश सरचिटणीस नाना पवार यांनी फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाचा जो अजेंडा आहे,त्यात यमदूत रिंगरूटचा उल्लेख आहे.असा पुरावा मासमीडियावर टाकून उल्हासनगरच्या विनाशामागे भाजपाचाच हात असल्याचे म्हटले आहे.भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुधीर बागुल,युवमोर्चाचे अध्यक्ष जय गायकवाड यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

"उल्हासनगगरात डीपी विरोधी वॉट्सअप ग्रुप"
डीपी हटाओ मोहीम ग्रुप,डीपी हटाओ सुभाष टेकडी,डीपी हटाओ शहर बचाओ,सेव्ह मोबाईल बाजार,डीपी हटाओ उल्हासनगर बचाओ अशा असंख्य वॉट्सअप ग्रुपवर डीपीचा कडाडून विरोध होऊ लागला आहे.28 तारखेला होणाऱ्या महासभे प्रसंगी ग्रुपवरील विरोधाचे पडसाद उमटण्याची शक्यता दिसू लागली आहे.

"सांताक्लॉज करणार डीपीची होळी"
उद्या 25 तारखेला ख्रिसमस आहे.याचे औचित्य साधून उल्हासनगर शहर विकास आराखडा विरोधी कृती समितीच्या वतीने सुभाष टेकडी मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात डीपीची होळी करण्यात येणार आहे.आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन किरण सोनावणे,संजय वाघमारे यांनी केले आहे.डीपीच्या विरोधातील वातावरण पाहता टेकडीवर प्रचंड गर्दी उसळणार.असे ठळक चित्र दिसू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com