अग्निशमन दलामुळे लगतचे कारखाने बचावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

पालघर : तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या सोबतीने वसई विरार महानगर पालिका, पालघर नागरपरिषद, बीऐआरसी व रीलायन्स डहाणूच्या बंबाने सलग 10 तास अथक प्रयत्न केल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमधील तीन उद्योग आगीतून बचावले. मात्र मोहिनी ऑर्गनिकस कंपनीचे तीन युनिट आगीमध्ये पूर्णपणे उध्वस्त झाले.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील टी- 77/78/79 या प्लॉट वर वसलेल्या मोहिनी ऑर्गनिकसमध्ये ऑईलयुक्त ईस्टर, पॉलीओलस असे स्पेशालिटी रसायन उत्पादित केली जातात. काल (ता 2) सायंकाळी थेर्मिक फ्लूईड बॉयलर मध्ये लागलेली आग पावसापासून संरक्षणार्थ आच्छादलेल्या ताडपत्रीमुळे काही क्षणात सर्वत्र पसरली.

अग्निशमन विभागाच्या 8 बंबानी व 40-45 अग्निशमन कर्मचारी - अधिकाऱ्यांनी ही आग विझवण्यास सलग आठ 8 तास सुमारे पाच 5 लाख लिटर पाण्याचा आणि 2500 लिटर फोमचा मारा केल्याने लगतच्या प्रीमियर इंटरमिडीएट्स, श्रीनाथ केमिकल्स, मिनार केमिकल्स, बर्फ कारखाना आगीपासून बचावल्या. या लगतच्या कंपन्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून मोहिनी मधील महेंद्र खुशवाह या तरुणाला दुखापत झाली. 

सायंकाळी 6.15 च्या सुमारास लागलेली आग मध्यरात्रीनंतर नियंत्रणात आली आणि पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास शमली. कंपनीमधील उपकरणे थंड करण्याचे काम अग्निशमन दलातर्फे सुरू असून मोहिनी ऑर्गनिकस कंपनीचा मुख्य भाग कोसळला असून पूर्णपणे उध्वस्त झाली. या आगीत किमान 13 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नोव्हेंबर 2016 मध्ये याच कंपनीच्या युनिट 1 ला भीषण आग लागली होती.

दोन शासकीय विभागात कार्य भिनंता
एकीकडे एमआयडीसी आणि इतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने आग विझविण्यासाठी तसेच ती पसरू नये म्हणून अहोरात्र काम केले असताना औद्योगिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटना स्थळी पोहचण्यास, जखमीची भेट घेण्यास 12-14 तास घेतले. या विभागाचे सह संचालक एस.गी धवड यांचाकडे चौकशी केली असता आगीबाबत प्राथमिक अहवाल तयार झाला नसल्याचे दुपारी पत्रकारांना सांगितले. या अपघात संदर्भात अधिक माहिती साठी वसई येथील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे सांगून शासनाने अपल्याला भ्रमणध्वनी पुरविला नसल्याने संपर्क क्रमांक देण्यास नकार दिला.

लुपिन ची मदत
आग विझविण्यासाठी साठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासत असल्याने टँकर द्वारे पाणी आणले जात होते. एमआयडीसी च्या फायर हायड्रेनट लाईन मधून पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने आगीचा लठिकानालगत असल्येल्या लुपिन केमिकलस या कंपनीने वेळीच मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्याने आग विझविण्यास मदत झालंयने तारापूर चे फायर ऑफिसर आनंद परब यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: marathi news marathi websites Palghar News Mumbai News