सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनवरून खून प्रकरणात आरोपींना अटक

मुरलीधर दळवी
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

मुरबाड (जि. ठाणे) : मुरबाड तालुक्‍यात दहा दिवसांपूर्वी झालेल्या एका जीप चालकाच्या हत्येच्या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना 'सीसीटीव्ही'मधील फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे चौघांना अटक केली. या चौघांनीही गुन्हा कबूल केला असून न्यायालयाने त्यांना 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

तालुक्‍यातील मानिवली येथील जीप चालक मधुकर उर्फ बबलू उमवणे यांची हत्या झाल्याचे 11 नोव्हेंबर रोजी उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी काल (रविवार) चौघांना अटक केली. आणखी एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. स्वप्नील वरकुटे, विजय वाघ, किरण मलिक आणि किरण हरड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिल्याचे मुरबाड पोलिसांनी सांगितले. 

'सरळगाव येथून बदलापूर येथे जीप भाडे घेऊन जातो' असे सांगून मधुकर 8 नोव्हेंबर रोजी घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. 11 नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह मुरबाड बारवी डॅम रस्त्यावर आढळून आला होता. 

या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना मुरबाड बारवी डॅम, कल्याण, सरळगाव या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, एन. एस. कारंडे, सागर चव्हाण आणि मुरबाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांचा सहभाग होता. या प्रकरणात दोनशेहून अधिक नागरिकांनी पोलिसांना मदत केल्याची माहिती विभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मोरे यांनी दिली. पोलिस निरीक्षक अजय वसावे या प्रकरणी तपास करत आहेत. 

Web Title: marathi news marathi websites Thane News Thane Crime News