ठाण्यातील रुंद पोखरण रस्त्याला मद्यपींचे ग्रहण!

श्रीकांत सावंत
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

ठाणे : ठाण्यातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यांचे सुशोभिकरण करण केल्यानंतर आता या विस्तीर्ण रस्त्यांना विविध प्रकारच्या अतिक्रमणांचे ग्रहण सुरू झाले आहे. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक एक या सुशोभित रस्त्याला चक्क मद्यपींचे ग्रहण लागले असून शहरातील मद्यपी या रस्त्याच्या बाजुला बसुन मुक्तपणे मद्यप्राशण करत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे सायंकाळ पासून ते रात्री उशीरापर्यंत हा कार्यक्रम सुरू असून मद्यप्राषण झाल्यानंतर मद्याच्या बाटल्या त्याच ठिकाणी फेकून ही मंडळी निघून जातात.

ठाणे : ठाण्यातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण करून त्यांचे सुशोभिकरण करण केल्यानंतर आता या विस्तीर्ण रस्त्यांना विविध प्रकारच्या अतिक्रमणांचे ग्रहण सुरू झाले आहे. ठाण्यातील पोखरण रस्ता क्रमांक एक या सुशोभित रस्त्याला चक्क मद्यपींचे ग्रहण लागले असून शहरातील मद्यपी या रस्त्याच्या बाजुला बसुन मुक्तपणे मद्यप्राशण करत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे सायंकाळ पासून ते रात्री उशीरापर्यंत हा कार्यक्रम सुरू असून मद्यप्राषण झाल्यानंतर मद्याच्या बाटल्या त्याच ठिकाणी फेकून ही मंडळी निघून जातात. अत्यंत टोलेजंग इमारती या भागामध्ये उभ्या राहिल्या असून या भागात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना या मद्यपींचा उपद्रव सुरू झाल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून सुरू झाली आहे. 

ठाण्यातील शांत आणि निसर्ग रम्य ठिकाणी जाऊन मद्यप्राषण करणाऱ्यांची जुना प्रकार असून अशा मद्यपींनी येऊर आणि उपवन परिसर व्यापून टाकला आहे. या मद्यपींकडून या भागातील नागरिकांना होणारा त्रासामुळे या भागातील अनेक नागरिक त्रस्त आहे. येथील मद्यपींविरूध्द स्थानिक नागरिक अधिक कठोर होऊन संघर्ष करत आहेत. त्यामुळे पोलीसांनाही या भागातील मद्यपींवर कारवाई करावी लागते. परंतु येऊर आणि उपवन भागातील मद्यपींची संख्या रोडावली असली तरी आता सुशोभित आणि विस्तिर्ण अशा पोखरण रस्त्यावर या मद्यपींनी हजेरी लावण्यास सुरूवात केल्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

या भागातील रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या छोट्या उद्यानांमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच वाढू लागल्यामुळे नागरिकांनाही त्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. तसेच संध्याकाळी आणि रात्रीच्यावेळी येथून एकट्या दुकट्या महिलेस प्रवास करणेही कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे या भागामध्ये पोलीसांनी व्यापक कारवाई करण्याची गरज असून पेट्रोलिंग करून येतील मद्यपींना वचक बसवण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून सुरू झाली आहे. या विषयी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप गिरीधर यांच्याशी संपर्क साधला असता पोखरण रस्त्यावर पोलीसांकडून वारंवार कारवाई केली जात आहे. पोलीसांच्या बिटमार्शल्स आणि पीसीआर कारमधून या भागात लक्ष ठेवले जात आहे. मद्यपाशन करणारे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. 

नव्या कोऱ्या रस्त्याची दुरावस्थेला सुरूवात... 
ठाण्यातील पोखऱण रस्त्याचे नव्याने नुतनीकरण झाले असून शहरातील सुंदर रस्त्यांमध्ये याची मोजणी करता येऊ शकते. परंतु या रस्त्याचे काम पुर्ण होऊन अवघे काही दिवस पुर्ण झाले नाहीत तोच या रस्त्यावर अतिक्रमण सुरू झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा छोटी उद्यान तयार करण्यात आले असून बाजुच्या भिंतींवर चित्र काढून कला दालन तयार करण्यात आले आहे. परंतु अशा रस्त्याच्या कडेला बसून मद्यपी मद्यप्राषण करून लागले आहे. बाटल्यांचा कचरा तेथेच फेकला जातो. वाहन चालक तेथेच गाड्या पार्क करून रस्त्यावर अतिक्रमण सुरू करण्यात आले आहे. शिवाय पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडूनही या भागात मद्यपींवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिक हवालदिल आहे.
- डाॅ. रहेश रविंद्रन, रहिवासी

बाटल्यांचा खच आणि फेरीवाल्यांचा उपद्रव...
ठाणे सिटीझन व्हाईस या संस्थेच्यावतीने पोखऱण रस्त्यावरील वाढत्या उपद्रवामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सुशोभित उद्यानाच्या ठिकाणी बाटल्यांचा वाढत्या संख्येमुळे पादचारी जखमी होण्यास सुरूवात झाल्याचे संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. मद्यपी वाढल्यामुळे फेरीवाल्यांनी गाड्या उभ्या करून त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था सुरू केली आहे. तसेच कचरा कुंड्या नसल्यामुळे सगळा कचरा या परिसरात फेकला जात असून त्यामुळे येथील रहिवाशांना त्रास सुरू झाला आहे. महापालिका प्रशासनाने या रस्त्याची देखभाल करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी माहिती संस्थेचे कॅसबर आॅगस्ट्रीन यांनी दिली. 

Web Title: marathi news marathi websites Thane News Thane Municipal Corporation