घराला लागलेल्या आगीत म्हशीचा होरपळून मृत्यू, 5 बैल गंभीर जखमी 

भगवान खैरनार
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मोखाडा : मोखाड्यातील गोमघर येथील रमेश केशव पाडेकर यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत घरामध्ये बांधलेल्या म्हशीचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर लगतच्या पडवीत बांधलेले  5 कर्ताऊ बैल गंभीर जखमी झाले आहेत.

मोखाडा : मोखाड्यातील गोमघर येथील रमेश केशव पाडेकर यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत घरामध्ये बांधलेल्या म्हशीचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर लगतच्या पडवीत बांधलेले  5 कर्ताऊ बैल गंभीर जखमी झाले आहेत.

पाडेकर कुटूंब या घरात झोपलेले नसल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली आहे. मात्र, रमेश पाडेकर या आदिवासी शेतकऱ्याचे एक लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. मोखाड्यातील गोमघर येथील रमेश पाडेकर यांचे गावालगत शेतावर घर आहे. या घराला रात्री 12 : 30 वाजता अचानक आग लागली. या आगीत घरात बांधलेल्या दुभत्या म्हशीचा होरपळून अक्षरशः कोळसा झाला आहे. या आगीच्या तिव्रतेने घराच्या पडवीनेही पेट घेतला. या पडवीमध्ये 5 कर्ताऊ बैल बांधले होते. त्यामुळे तेही गंभीर जखमी झाले आहेत.

घरात साठवलेले जळाऊ लाकडे तसेच घराचे सागवान लाकडे जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरात पाडेकर कुटूंब झोपलेले नसल्याने जिवीत हानी टळली. या घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी  एन. एल. शिंदे , तलाठी आर. आर. तायडे यांनी घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला आहे. सुमारे एक लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तर आपल्याला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश पाडेकर याने केली आहे.   

Web Title: Marathi news mokhada news fire home buffalo dies bull

टॅग्स