मोखाड्यात अटीतटीच्या लढतीत भाजपची सरशी

Mokhada-elections
Mokhada-elections

मोखाडा : मोखाड्यातील सायदे आणि किनिस्ते या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणूका अटीतटीच्या झाल्या आहेत. यामध्ये सायदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे दिलीप झुगरे 18 तर किनिस्ते सरपंच पदी भारती शिंदे 21 मतांनी विजयी झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी शिवसेनेला धोबीपछाड देत पूर्ण बहुमतात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सायदे ग्रामपंचायतीची निवडणूक सेनेसह भाजपने ही प्रतिष्टेची केली होती. सायदे ग्रामपंचायती मध्ये 11 सदस्य संख्या आहे. त्यामध्ये   4 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामध्ये सेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले होते. आज झालेल्या मतमोजणीत उर्वरीत 7   जागांपैकी 4 जागी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तर सरपंच पदाच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दिलीप झुगरे यांनी शिवसेनेचे देवराम कामडी यांच्या वर 18 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवत सेनेला धोबीपछाड देत पूर्ण बहुमत सिद्ध केले आहे. दिलीप झुगरे यांना 390 तर देवराम कामडी यांना 372 मते मिळाली आहेत.

किनिस्ते ग्रामपंचायतीची निवडणूक ही अटीतटीचीच झाली आहे. येथे भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार भारती शिंदे यांनी शिवसेनेच्या कविता मडके यांच्यावर 21 मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला आहे. भारती शिंदे यांना 323 तर सेनेच्या कविता मडके यांना  302 मते मिळाली आहेत. किनिस्ते ग्रामपंचायती मध्ये 7 सदस्य संख्या आहे. त्यामध्ये भाजपचे 3 सदस्य अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज झालेल्या मतमोजणीत पुन्हा 2 सदस्य निवडून आणत भाजपने एकूण 5 उमेदवार निवडून आणत सरपंच पदासह किनिस्ते ग्रामपंचायतीवर पूर्ण बहुमत मिळविले आहे. या निवडणूकीसाठी शिवसेनेने प्रचाराची राळ उडवली होती. तर भाजपने कोणताही गाजावाजा न करता, सेनेच्या गडाला सुरूंग लावला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे, तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, माजी ऊपसभापती एकनाथ झुगरे, चंद्रकांत शिंदे, युवा मोर्चाचे उमेश येलमामे यांनी दोन्ही ग्रामपंचायतीत प्रचाराची रणनिती आखली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com