मोखाड्यातील सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी विशेष पथक 

भगवान खैरनार
शुक्रवार, 9 मार्च 2018

मोखाडा : मोखाड्यातील खोडाळा गावात पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासासाठी पालघर गुन्हे अन्वेषण विभाग आणि मोखाडा पोलीस यांचे संयुक्त पथक पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. 

मोखाडा तालुक्यात सशस्त्र दरोड्याची घटना  पहील्यांदाच खोडाळा गावातील व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात 7 मार्चला घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मोखाडा तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक संजय घाडगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तर घटनेचा तपास करण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभाग आणि मोखाडा पोलीस यांचे संयुक्त पथक स्थापन केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली आहे. 

या पथकाने तातडीने घटना स्थळी भेट देऊन, पीडित चंद्रकांत किर्वे यांच्याकडून माहीती घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. मात्र, दरोडेखोरांनी खोडाळा गावातील अन्य व्यापार्यांची ही माहीती , आपल्याला असल्याचे चंद्रकांत किर्वे यांना सांगून पुन्हा दरोडा टाकण्याची धमकी दिल्याने खोडाळ्यातील व्यापारी धास्तावले आहेत. त्यामुळे खोडाळा गावात रात्रीच्यावेळी पोलीस गस्ती पथक ठेवण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. 

Web Title: Marathi news mokjhada news police additional unit robbery