नवी मुंबई विमानतळ भूमिपूजनावर तब्बल 10 कोटींचा चुराडा

नवी मुंबई विमानतळ भूमिपूजनावर तब्बल 10 कोटींचा चुराडा

नवी मुंबई - प्रकल्पग्रस्त पुनर्वसन पॅकेज जाहीर करण्यासाठी अनेक बैठका घेणाऱ्या सिडकोने नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमावर तब्बल 10 कोटी 34 लाखांची उधळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. या शानदार कार्यक्रमाचे आयोजक आणि विमानतळाची कंत्राटदार कंपनी असलेल्या जीव्हीकेने खर्चाचे देयक आता सिडकोला पाठवले आहे. देयकानुसार सिडकोची नोडल एजन्सी एनएमआयएलने 40 टक्के; तर उर्वरित 60 टक्के खर्च जेएनपीटी व सिडकोने (6 कोटी 20 लाख) देण्याची मागणी जीव्हीकेने केली आहे. 

नवी मुंबई विमानतळाचे 18 फेब्रुवारीला उलवे नोडमधील कोंबडभुजे गावाजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याच कार्यक्रमात जेएनपीटीतील चौथ्या बंदराचेही उद्‌घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सिडकोच्या वतीने भव्य सभामंडप, तीन हेलिपॅड आदी अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. त्याची जबाबदारी सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जीव्हीके या कंत्राटदार कंपनीवर दिली होती. आता या सोहळ्याचे जीव्हीकेने सिडकोकडे तब्बल 10 कोटी 34 लाख रुपयांचे देयक पाठवले आहे. यामधील 3 कोटी 44 लाख इव्हेंट मॅनेजमेंटवर खर्च करण्यात आले आहेत. रस्ते, मैदान आणि हेलिपॅडसारख्या सुविधांवर 3 कोटी 30 लाखांचा खर्च झाल्याचे देयकावरून दिसत आहे, तर कार्यक्रमाच्या जाहिरातबाजीवर तब्बल 1 कोटी 20 लाखांचा खर्च करण्यात आला आहे. अन्य किरकोळी बाबींवर पाच लाखांपासून दीड कोटींपर्यंत खर्च झाल्याचे कंत्राटदाराने देयकात नमूद केले आहे. 

विमानतळ भूमिपूजन कार्यक्रमाच्या खर्चाचे देयक जीव्हीकेकडून सिडकोला मिळाले आहे; परंतु एवढी रक्कम भरायची किंवा नाही यावर सिडकोने ठरवले नाही. सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल. 
- प्राजक्ता लवंगारे, सहव्यवस्थापकीय संचालिका 

खर्चाचा आकडा वाढता वाढे 

- इव्हेंट मॅनेजमेंट- 3 कोटी 44 लाख 
- रस्ते व तात्पुरत्या सुविधा- 3 कोटी 30 लाख 
- जाहिरात- 1 कोटी 20 लाख 
- आकस्मित खर्च 50 लाख 
- सीसी टीव्ही- 15 लाख 
- जेवण व नाश्‍ता- 10 लाख 
- लहान कंत्राटे व वाहनतळ- 5 लाख 
- झेरॉक्‍स-फॅक्‍स आणि इतर किरकोळ खर्च- 1 लाख 
- स्थानिक परवानग्या- 1 लाख 
18 टक्के जीएसटी : 1 कोटी 58 लाख 
- एकूण 10 कोटी 34 लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com