ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूरात विजांच्या गडगटासह जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाला सुरवात झालीये. ठाण्यात विजांच्या गडगटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे  ठाणे शहरातील खारटन रोड भागात एका रिक्षावर झाड कोसळलं आहे. भास्कर कॉलनी नौपाडा इथे पण एक झाड कोसळलं आहे. मुसळधार पावसामुळे दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास ठाणेकरांची चांगलीच त्रेधा उडाली आहे.

ठाण्यासोबत भिवंडी, कल्याण, डोंबिवली, बदलापूर या मुंबईच्या उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरमधल्या काही भागात वीज पुरवठा बंद करण्यात आलाय.

फोटो - खारटन रोड भागात रिक्षावर कोसळलेलं झाड 

Image may contain: one or more people, people standing and outdoor

WebTitle : marathi news mumbai and suburbs heavy rainfall on the eve of dussehra

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: marathi news mumbai and suburbs heavy rainfall on the eve of dussehra