बजेट महापालिकेचे

बजेट महापालिकेचे

नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आहे. समाजघटकातील शिक्षक, पालक, व्यापारी, खेळाडू यांना त्याविषयी काय वाटते, याचा घेतलेला मागोवा.

नवी मुंबई महापालिका सीबीएसई आणि आयसीएसई शाळा सुरू करणार, ही खरोखर अभिमानाची बाब आहे. पालिकेने शाळा सुरू करताना खासगी शाळांप्रमाणे शिक्षक व शाळेचा दर्जा राखणे गरजेचे आहे. 
- सुजाता शिंदे, पालक, सानपाडा

शहरात सीसी टीव्ही बसवल्यामुळे गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना चांगली मदत होईल. पर्यायाने गुन्हेगारीत घट होईल. शहरातील शाळा, महाविद्यालये, पर्यटनस्थळ आदी ठिकणी सीसी टीव्हींची गरज आहे.
- सूरज पाडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सानपाडा

नवी मुंबई महापालिका सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळा सुरू करणार, हा निर्णय २१ व्या शतकातील शहराला साजेसा आहे. परंतु पालिकेने माध्यमिक विभागाच्या शाळा वाढवल्या पाहिजेत. 
- अशोक चांदणे, पालक, नेरूळ

मालमत्ता करावरील व्याज जास्त असल्याने व्यापाऱ्यांची आणि उद्योजकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी राहिली आहे. थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्याचा घेतलेला निर्णय सुखावणारा आहे. 
- अशोक वाळुंज, व्यापारी, कांदा-बटाटा मार्केट

नवी मुंबई पालिकेच्या शाळांच्या इमारती प्रशस्त आहेत. विद्यार्थ्यांसाठी सोई-सुविधाही चांगल्या दिल्या जातात. फक्त शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांची संख्या वाढवली पाहिजे. 
- सुमन शर्मा, शिक्षक

महापालिकेचे स्वत-चे मोरबे धरण आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासत नाही. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. यावर नियंत्रण आणले नाही तर नवी मुंबईवर पाणीटंचाईचे संकट येऊ शकते. 
- सुनील सुतार, अध्यक्ष, पाम बीच रेसिडेन्सी

नवी मुंबईतील उड्डाणपुलांखाली बॅडमिंटन कोर्ट झाल्यास सर्वसामान्य लोकांमधूनही चांगले बॅडमिंटनपटू उदयास येतील. त्यामुळे शहराचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक वाढण्यास मदत होईल.
- रोमित आनंद, बॅडमिंटनपटू

सीबीएसई व दोन आयसीएसई शाळा, ई-लायब्ररी पालिकेने सुरू केल्यास गरीब विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळू शकेल. यामुळे शैक्षणिक स्तर अधिक उंचावेल.
प्रतीक शिंदे, विद्यार्थी

जादा पाणी, जादा पैसे यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यास मदत होऊन पाणीटंचाई कमी होऊ शकेल. गावठाण व झोपडपट्ट्यांची परिस्थिती पाहता विकासासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद पुरेशी नाही. 
- नयना नाईक, नोकरदार

डेब्रिजचे रिसायकलिंग करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. डेब्रिजमुळे निर्माण होणाऱ्या समस्या यामुळे कमी होण्यास मदत होईल. त्यापासून बनवलेले बांधकाम साहित्य कमी किमतीत उपलब्ध होऊ शकेल. 
- सुभाष म्हात्रे, बांधकाम व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com