बुलेट ट्रेन टर्मिनससाठी जमीन हस्तांतरण आज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - वांद्रे-कुर्ला संकुलात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या भूमिगत टर्मिनससाठी आवश्‍यक जमीन हस्तांतरण प्रक्रिया मंगळवारी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टर्मिनसच्या बांधकामासाठी आवश्‍यक जमिनीचे दस्ताऐवज रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना देतील. 

ज्या जमिनीवर हे टर्मिनस उभारण्यात येणार आहे, तेथे आंतरराष्ट्रीय वित्त सेवा केंद्रही (आयएफएससी) उभारले जाणार असल्याची शक्‍यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मुख्यालयाजवळ असलेला पेट्रोल पंपही भूमिगत बांधण्यात येणार आहे. 

भूमिगत टर्मिनसची रचना राष्ट्रीय जलद निगम रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) केली असून, रेल्वे मंत्रालय हा प्रकल्प साकारत आहे. या स्थानकात सहा फलाट असतील. एमएमआरडीएच्या मुख्यालयाजवळील भूमिगत बुलेट ट्रेन स्थानकाच्या इमारतीत दुकाने, तिकीट आरक्षण केंद्र आणि फूड कोर्ट असेल. 

बुलेट ट्रेनच्या देखभालीसाठी आवश्‍यक जागा सर्वांत वरच्या मजल्यावर असेल. प्रशासन आणि उपकरणासाठीही या मजल्याचा वापर केला जाईल. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुकाने, फूड कोर्ट असेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: marathi news mumbai Bullet train