छात्रभारती विद्यार्थी संघटनेचा स्नेहमेळावा संपन्न

दिनेश चिलप मराठे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

मुंबई - पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगीरीसाठी युवा पत्रकारांना गौरी लंकेश युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. छात्रभारती विद्यार्थी संघटना यंदा 35 वे वर्धापन वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त 10 जानेवारी 2018 ला छात्रभारती संघटनेच्या वतीने परळ येथील दामोदर हॉलमध्ये छात्रभारती स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या वर्षी तरुण पत्रकार, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, खेळाडू, एनएसएस युनीट, सामाजिक संस्था यांना विषेश पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई - पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगीरीसाठी युवा पत्रकारांना गौरी लंकेश युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. छात्रभारती विद्यार्थी संघटना यंदा 35 वे वर्धापन वर्ष साजरे करत आहे. त्यानिमित्त 10 जानेवारी 2018 ला छात्रभारती संघटनेच्या वतीने परळ येथील दामोदर हॉलमध्ये छात्रभारती स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या वर्षी तरुण पत्रकार, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, खेळाडू, एनएसएस युनीट, सामाजिक संस्था यांना विषेश पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. निवड समितीने निवड केलेल्या व्यक्तींच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव छात्रभारती परिवाराकडून यावेळी करण्यात आला.

यावेळी युवा पत्रकारांना पत्रकार गौरी लंकेश यांच्या नावाने गौरी लंकेश युवा पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारीतेतील उल्लेखनीय कामगीरीसाठी दैनिक सकाळच्या प्रतिनिधी पत्रकार पूनम कुलकर्णी, झी 24 तास चे प्रविण दाभोळकर,लोकमतचे नावदेव कुंभार या युवा पत्रकारांना या कार्यक्रमात आमदार कपील पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कपील पाटील, शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे उपस्थित राहिले होते. तसेच छात्रभारतीचे मुंबई सचिव सचिन काकड, मुंबई विद्यापीठ संघटक रोहित ढाले, मुंबई छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे, मुंबई कार्यालयीन सचिव भगवान बोयाळ, राज्य उपाध्यक्ष सागर भालेराव, विशाल कदम मुंबई उपाध्यक्ष, मुंबई उपाध्यक्ष अमरिन मोगर आदि संघटनेचे सदस्य कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमात बोलताना आमदार कपील पाटील म्हणाले की, 4 तारखेचा छात्र भारतीचा कार्यक्रम भाजप सरकार ने मोडून पाडला. पूर्वीचे सरकार बोलायचे आताच सरकार बोलतचं नाही. ते फक्त आपली मन की बात करतात आमची मनातली बात ऐकतच नाही असा टोला त्यांनी यावेळी पंतप्रधानांना लगावला. या सरकारची फक्त दोन धोरणे आहेत. कोणी काय खायचे ? किती आणि काय शिकायचे? अश्या पद्धतीच हे सरकार आहे. 2 कोटी लोकांना नोकरी देणार असे सरकार सत्तेत आल्यानंतर सांगितले होते. पण सध्या फक्त 2 लोकांना नोकरी मिळाली एक पंतप्रधानांना आणि एक अमित शाह यांना असेही ते यावेळी बोतताना म्हणाले. स्नेह मेळाव्याला उपस्थित राहीलेल्या सर्वांचे स्वागत करताना मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी वर्षभरात संघटनेने केलेल्या कार्याची उपस्थितांना थोडक्यात माहीती दिली. कार्यक्रमानंतर  'सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का?' या विनोदी नाटकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार स्विकारल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना पत्रकार पूनम कुलकर्णी म्हणाल्या कि, ज्येष्ट पत्रकार गौरी लंकेश यांच्या नावाने मला देण्यात आलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि प्रेरणादायी आहे. सुप्रसिद्ध पत्रकार आणि बंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक असलेल्या गौरी लंकेश यांच्या नावाने मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या नेहमीच स्मरणात राहील. छात्रभारतीच्या निवड समितीने हजारो पत्रकारांमधून कोणत्याही शिफारशी शिवाय माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्यासाठी मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. 
 

Web Title: marathi news mumbai chhatrabharati student union program