गिरगाव आर्यन एज्युकेशन सोसायटीत डोळे तपासणी शिबिर संपन्न

marathi news mumbai child eye check up
marathi news mumbai child eye check up

मुंबादेवी - गिरगाव येथील सुप्रतिष्ठित म्हणून मान्यता असलेल्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास विद्यार्थ्यांचा भरघोस पाठिंबा लाभल्याने डोळे तपासणी युनिटने समाधान व्यक्त केले. 'डोळ्यांचे आरोग्य सांभाळा, टीव्ही आणि मोबाईल पासून चार हात दूर राहा, आपले डोळे हे शरीरातील अत्यंत महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. त्यांची काळजी घेणे हे सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्या दृष्टीने फार गरजेचे आहे. याच दृष्टीकोनातून आम्ही 'सकाळ माध्यम' आणि के. बी. हाजी बच्चु अली डोळ्यांचे व कान, नाक, घसा धर्मार्थ हॉस्पिटल परळ यांच्या विशेष सहकार्याने हे डोळे तपासणी आणि मोफत चष्मा वाटप शिबिर भरविलेले आहे,' असे आर्यन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आमोद उसपकर यांनी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना म्हटले. 

याप्रसंगी मुख्याध्यापक भीमसिंग गावीत, जगन्नाथ घरत, प्रमिला नायकवडी आणि विद्याश्री चिंदरकर हे उपस्थित होते. इयत्ता पहीली ते दहावीच्या वर्गातील मुलांनी शिबिरात सहभागी होत डोळ्यांची तपासणी करुन घेतली. प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील एकूण 530 विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना डोळ्यांतून पाणी येते का?, तिरळे (squint), रंग छटा तपासणी, मोती बिंदू, विटामीन 'अ' ची कमतरता आणि अभ्यास करताना किंवा फळयावरील अक्षरे वाचताना पडणारा ताण, डोके दु:खी आदी विविध प्रश्न विचारुन तपासण्यात येत होते. युनिट कोऑर्डिनेटर सतीश रणदिवे, सुगंध मोहिते यांचेसह अश्विनी साळवी, आफरीन सिद्दीकी, योगेश गवळी, सचिन पवार, नयना गमरे, आणि अनिल कदम यांनी विशेष सहकार्य केले. सकाळ माध्यम यांचेसह साबिक आणि मिशन फॉर विजन हे शिबिराचे प्रायोजक होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com