चेतना कॉलेजमध्ये 'नाविन्य' महोत्सव संपन्न

दिनेश चिलप मराठे
रविवार, 7 जानेवारी 2018

मुंबई - वांद्रे येथील चेतना कनिष्ठ महाविद्यालयाचा 'नाविन्य' हा वार्षिक महोत्सव महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. चेतना कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन चेतना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीदत्त हळदणकर यांनी केले. 

याप्रसंगी चेतना शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. अशोक चौधरी हे उपस्थित होते. या महोत्सवात तरुणाईने नृत्य, गायन आदी विविध कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चेतना नाट्य मंचने सादर केलेल्या 'मी लाभार्थी' या पारितोषिक विजेत्या एकांकिकेस उपस्थितांनी भरभरून दाद दिली. चेतना महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सांस्कृतिक सप्ताहात झालेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. चेतना सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख प्रा. किरण राजभोज व प्रा. अर्चना तांबोळी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी व उपप्राचार्य प्रा. गिरीश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. या महोत्सवात प्राध्यापकवर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: marathi news mumbai college program dance singing