मुंबई महानगरपालिकेची पल्स पोलिओ मोहीम जोरात 

marathi news mumbai corporation polio
marathi news mumbai corporation polio

मुंबई - मुंबई महानगरपालिकेची पल्स पोलिओ मोहीम जोरात सुरु असून काल रविवार 28 जानेवारी पासून 5 दिवसीय मोहिमेस प्रारंभ झालेला आहे. काल मुंबईतील प्रत्येक संस्था कार्यालये, गणेश मंडळे, मुख्य चौक, शाळा-कॉलेजेस, बस डेपो, रेल्वे स्थानक येथे पालिका आरोग्य सेविकांमार्फत पोलिओचे सिर्फ 'दो बूँद' डोस देण्यात येत होते. त्यातही जी कुटूंबे मुंबई बाहेर होती, त्यांच्या मुलांसाठी आज (सोमवार 29 जानेवारी) खास अशा कुटूंबियांच्या घरोघरी जाऊन डोस देण्यात येत आहेत. 0 ते 6 वर्षीय बालकांना घरोघरी पोलिओ लसिकरण आरोग्य समन्वयक प्रियांका शेळके, आरोग्य सेविका कांचन वाघेला आणि ईशा त्रिपाठी या करीत असून त्यासाठी त्या सकाळी 9 वाजल्यापासून घरोघरी जात आहेत.

उमरखाडी अरुणोदय निवास येथे वास्तव्यास असलेल्या दिव्यांग पालिका कर्मचारी सरिता शेडगे यांचा 6 वर्षीय मुलगा कृष्णकाली यास आज पोलिओ डोस देण्यात आला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, 'मी 9 महिन्यांची असताना मला पोलिओ डोस दिला गेला होता, पण काही इंन्फेक्शनमुळे मला पोलिओने अपंगत्व आले. माझ्या बाबतीत जे घडले ते इतर कोणाच्याही बाबतीत घडू नये म्हणून प्रत्येक पालकांनी न चुकता आपल्या 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोलिओ लस द्यावी ही विनंती करते. कारण पोलिओ मुळे दोन्ही पायांना अपंगत्व आल्याने आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला. माझी आई सुरेखा यांनी घेतलेल्या मोठ्या मेहनतीमुळे मला शिक्षण घेता आले. मी मुंबई विद्यापीठातून B.Com आणि YCMOU विद्यापीठातून M.A. मराठी पदवी धारक आहे. आईमुळेच मला शिक्षण घेता आले. मी आज पालिका सेवेत लिपिक पदावर कार्यरत आहे. काल आम्ही मुंबई बाहेर असल्याने कृष्णकालीला पोलिओ डोस देता आला नव्हता. पण आता डोस दिलाय. पालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पोलिओ मुक्त भारत मोहिमेचे मी सहर्ष स्वागत करते.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com