पुन्हा एका हॉटेलला आग..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

पनवेल - कामोठे येथील सेक्टर 17 मधील गुप्ता आइसक्रीम आणि पाणीपुरी सेंटरच्या किचनमध्ये सोमवार ता. 8 ला आग लागली. दुपारी साडेतिनच्या सुमारास किचनमधील गॅस सिलेंडरच्या नळीला लागलेल्या आगीवर कळंबोली येथील सिडकोच्या अग्नीशमन दलाने नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले असून आगीत कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही.

महत्वाचे म्हणजे कमला मिल परिसरात मोजेस मेस्ट्रो पबला लागलेल्या आगीनंतर पनवेल पालिकेने हॉटेल, बारमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पनवेल शहर पालिका क्षेत्रातील सुमारे 42 हॉटेल बार मालकांना फायर ऑडिट पूर्ण करेपर्यंत हॉटेल व बार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. हॉटेल, रेस्टॉरेंन्ट सुरु ठेवण्यासाठी अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासोबत आरोग्य व अन्न औषधे प्रशासनाचे प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र आज ज्या गुप्ता आइस्क्रीम व पाणीपुरी सेंटरच्या किचनमधे आग लागली, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा अथवा कोणत्याही प्रकारचा हॉटेल चालवण्याचा परवाना नसल्याचे उघड झाले आहे.

Web Title: marathi news mumbai hotel fire