पेट्रोल पंपावरचे कर्मचारीच मोबाईलवर व्यस्त

संजीत वायंगणकर
बुधवार, 31 जानेवारी 2018

डोंबिवली : पेट्रोल वा अन्य इंधन भरताना मोबाईल वापरल्यास स्फोट होतो. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर करू नये, असे आवाहन प्रभावीपणे करण्यात येते. मात्र डोंबिवली जवळच्या एका पंपावर लोकांना ब्रम्हज्ञान सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियम पायदळी तुडवून जिवघेणा खेळ सुरू केल्याचे आढळून आले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जीविताची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाची? पेट्रोलपंप चालकांची का सुस्त शासकीय यंत्रणांची व निष्क्रिय अधिकाऱ्यांची? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

डोंबिवली : पेट्रोल वा अन्य इंधन भरताना मोबाईल वापरल्यास स्फोट होतो. त्यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल फोनचा वापर करू नये, असे आवाहन प्रभावीपणे करण्यात येते. मात्र डोंबिवली जवळच्या एका पंपावर लोकांना ब्रम्हज्ञान सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नियम पायदळी तुडवून जिवघेणा खेळ सुरू केल्याचे आढळून आले आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जीविताची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाची? पेट्रोलपंप चालकांची का सुस्त शासकीय यंत्रणांची व निष्क्रिय अधिकाऱ्यांची? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.

वाहनात पेट्रोल भरताना वाहनावरून उतरणे गरजेचे आहे. कारण इंजिन आणि त्याचा exhaust पाईप अतिशय गरम झालेला असतो पेट्रोल भरताना एक थेंब सुद्धा आग लाऊ शकतो आणि जीवघेणा अपघात होऊ शकतो परंतु धावपळीच्या आयुष्यात सर्वच घाईत असतात तेव्हा निदान सतर्कता बाळगून सावधगीरीचे नियम पाळणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. शेवटचा थेंब सुद्धा टाकीतच पडेल याची काळजी घेण्याची पंपावरील कामगाराची जबाबदारी आहे, चुकुन पाईप काढताना एक थेंब जरी बाहेर पडला तर अनर्थ होऊ शकतो. तसेच वायू (gas) वर चालणाऱ्या वाहनात इंधन भरताना सुद्धा वाहनातून उतरून काही अंतरावर उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून अपघाताला निमंत्रण दिले जाते. हाच निष्काळजीपणा मोबाईल फोनच्या वापराबाबतीत सुद्धा दिसून येतो, पेट्रोल पंपावर मोबाइल फोनवर बोलणे हानिकारक आहे हे माहिती असून सुद्धा सर्रासपणे लोक याकडे कानाडोळा करतात.

मोबाईल फोन जे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे, ते चालण्यासाठी विद्युत प्रवाहाची गरज असते. जो त्यातील बॅटरीमधून त्याला मिळतो. मोबाईलवर जेव्हा केव्हा प्रोसेस चालू असेल तर त्याच्या सर्किट बोर्डमधून विद्युत प्रवाह चालू असतो. त्यातून आपल्या डोळ्यांना न दिसणारे स्पार्क निघू शकतात, ही एक शक्यता आहे. स्पार्क केव्हा होईल ते सांगू शकत नाही.

पेट्रोल जे अती ज्वलनशील असते, त्याचा बॉईलिंग पॉईंट खूप कमी असतो. वातावरणात उघडे ठेवल्यास त्याचे गॅसमध्ये रूपांतर होते, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. मोबाईलमधून निघणारा स्पार्क या पेट्रोलियम वायूच्या संपर्कात आल्यास स्फोट होऊ शकतो. अशी परिस्थिती असतानाही कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या एका पंपावरील कर्मचारी चक्क मोबाईलवर व्यस्त असल्याचे आढळून आले. पेट्रोल पंपावर मोबाईल ऑन करू नये हे कायदे आणि नियम फक्त सर्वसामान्यांना किंवा इंधन भरायला आलेल्या लोकांसाठी असतात.

रविवारी रात्री 11.30 वाजता वैभवनगरी परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारीच मोबाईलवर चाळे करताना आढळले. काही वाहनचालकांनी या नेटकरी कर्मचाऱ्यांचे फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केले. लोक फोटो काढत असतानाही हे कर्मचारी मोबाईलमध्येच गुंग होते. त्यामुळे होऊ शकणाऱ्या गंभीर अपघाताची कल्पनासुध्दा करता येणार नाही. त्यामुळे लोका सांगे ब्रम्हज्ञान...आपण कोरडे पाषाण...असाच संदेश बहुदा हे कर्मचारी देत असावेत, असे दिसते

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: Marathi news mumbai new petrol pump employee mobile use