कुरुंदकरचे राष्ट्रपती पदक परत घेण्याची शिफारस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला देण्यात आलेले राष्ट्रपती पदक परत घेण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे. हे प्रकरण वरिष्ठांकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला का, याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

कुरुंदकरला गेल्या वर्षी 24 जानेवारीला राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्याला हे पदक जाहीर झाल्याचा खुलासा गृह विभागाने केला आहे.

गेल्या वर्षी 31 जानेवारीला कुरुंदकरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला 7 डिसेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले, असे पाटील यांनी सांगितले.
किरण पावसकर यांनी बिद्रे खुनाविषयी प्रश्‍न उपस्थित केले होते. या खुनाची उकल उशिरा झाली. त्यामागे वरिष्ठांचा हात असल्याची शंका पावसकर यांनी उपस्थित केली होती. दोन वर्षे हे प्रकरण दाबून टाकण्यामागे हात असणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: marathi news mumbai news abhay kurundkar president award ranajit patil