अंगणवाडी कर्मचारी सेवासमाप्तीची वयोमर्यादा पूर्ववत करणार - पंकजा मुंडे

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई : 14 मार्चला विधान भवन येथे महिला व बालविकास मंत्री, पंकजा मुंडे यांची अंग अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीं सोबत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने सेवासमाप्तीचे वय पूर्ववत 65 करणे, 1 एप्रिल 2018 पासून अजून 5% मानधनवाढ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

मुंबई : 14 मार्चला विधान भवन येथे महिला व बालविकास मंत्री, पंकजा मुंडे यांची अंग अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधीं सोबत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने सेवासमाप्तीचे वय पूर्ववत 65 करणे, 1 एप्रिल 2018 पासून अजून 5% मानधनवाढ इत्यादी प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

सेवासमाप्तीची वयोमर्यादा कमी करण्याबाबत मी कठोर नसून तो निर्णय सामान्य प्रशासन विभागाशी चर्चा करून घेतला जाईल. वयोमर्यादा पूर्ववत करण्याचा मी गांभीर्याने विचार करेन. असे मंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिले. अन्य मागण्यांवर देखील सविस्तर चर्चा झाली. 5% मानधनवाढीचा आदेश काढणे, मानधन नियमितपणे देणे, आहाराचा दर व भाडे वाढवणे, वजनकाटे, रजिस्टर्स व अहवाल पुरवणे इत्यादी मागण्यांवर देखील मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

वयोमर्यादेबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांना 8 दिवसांचा अवधी देण्याचा निर्णय त्यानंतर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तोपर्यंतच्या कालावधीत मुंबईत आंदोलन करणे योग्य होणार नाही आणि म्हणून 20 मार्चपासून होणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिलेल्या मुदतीपर्यंत वयोमर्यादेबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास 27 मार्चला आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा कृती समितीने दिला आहे. कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे,भगवानराव देशमुख, निशा शिऊरकर, सुवर्णा तळेकर, अप्पा पाटील यांनी बैठकीत भाग घेतला. तसेच किसान सभेचे नेते व माकपचे आमदार जे पी गावीत यांनी देखील बैठकीत कृती समितीच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. शासनाच्या वतीने स्वतः मंत्री महोदयांव्यतिरिक्त सचिव विनिता वेद सिंघल, आयुक्त कमलाकर फंड यांनी चर्चा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news mumbai news anganwadi karmachari retirement