पावणे दोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

त्यांनी आरडाओरड करीत अली याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 83 बनावट नोटा आणि 500 रुपयांच्या 18 बनावट नोटा असे एकूण 1 लाख 75 हजारांचे बनावट चलन सापडले. 

ठाणे : ठाणे स्थानक परिसरात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन हजारांची बनावट नोट वटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भामट्याकडून बनावट नोटांचे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. या भामट्याकडून 500 व दोन हजारांच्या तब्बल 1 लाख 75 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठाणे स्थानक परिसरातील मनजित सिंग सबरबाल याच्या गारमेंट कपडे विक्रीच्या हातगाडीवर वडाळा येथील रहिवासी मोहम्मद बाबर सेराजुल अली (वय 26) याने कपड्याची खरेदी केली. त्या वेळी त्याने दोन हजारांची नोट दिली; मात्र ती नोट बनावट असल्याचे मनजित याच्या लक्षात आले.

त्यांनी आरडाओरड करीत अली याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 83 बनावट नोटा आणि 500 रुपयांच्या 18 बनावट नोटा असे एकूण 1 लाख 75 हजारांचे बनावट चलन सापडले. 

Web Title: marathi news mumbai news around 2 lakhs fake notes captured crime news

टॅग्स