संशयिताने दिली अश्विनी बिद्रेंच्या खुनाची कबुली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिंद्रे यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली संशयित आरोपी महेश पळणीकर याने दिली आहे. 

बिद्रे प्रकरणाची उकल अंतिम टप्प्यात आली आहे. अश्विनी यांची हत्या करून लाकूड कापण्याच्या मशिनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते वसईच्या खाडीत फेकून दिले, अशी कबुली आरोपी महेश पळणीकरने दिली आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अभय कुरुंदकर, त्याचा चालक राजू पाटील, कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रॅंचकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 
Web Title: Marathi news mumbai news ashwini bindre case confession murder