बायोमेट्रिक हजेरीविरोधात आजपासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

मुंबई - बायोमेट्रिक हजेरीमुळे पालिकेतील अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागल्याने कामगारांमध्ये असंतोष आहे. बायोमेट्रिक हजेरी पद्धत आणि वेतनकपातीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोमवारी, 12 मार्चपासून "वेळेनुसार काम' या अभिनव आंदोलनाचा इशारा बृहन्मुंबई महापालिका अभियंता संयुक्त कृती समितीने दिला आहे.

सफाई कामगारांपासून ते अभियंते-अधिकाऱ्यांपर्यंत बायोमेट्रिक हजेरीमुळे अनेकांचे वेतन कापण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या कामगारांमध्ये असंतोष खदखदत आहे. प्रशासनाकडून अभियंत्याच्या कार्यालयीन वेळा निश्‍चित करण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. कामाच्या वेळा निश्‍चित करा, तसेच वेळेनुसार काम या मागणीसाठी अभियंते आता वेळेनुसार काम हे आंदोलन करणार आहेत.

Web Title: marathi news mumbai news biometric presenty agitation