तोतया पोलिसाला गोरेगावमध्ये अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - तोतया पोलिसाकडून गंडवले गेल्यानंतर त्या पद्धतीने इतरांचीही फसवणूक करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (ता. 13) अटक केली. सागर वाल्मीकी असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात मेघवाडी, एमआयडीसी आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

खासगी बसवर चालक म्हणून कामाला असलेला सागर दिंडोशीत राहतो. त्यापूर्वी त्याचे मेघवाडी परिसरात हॉटेल होते. पोलिसाच्या वेशातील व्यक्तीने त्याला गंडवून पैसे नेले होते. नंतर व्यवसाय होत नसल्यामुळे सागरने हॉटेल बंद करून सागर खासगी बसवर चालक म्हणून काम करू लागला. त्याचवेळी झटपट श्रीमंत होण्यासाठी पोलिस होऊन तो इतरांना फसवू लागला. नुकतेच त्याने ओशिवरा येथील महिलेला मंत्रालयात नोकरी लावतो, असे सांगत 60 हजार रुपयांना फसवले होते. काम होत नसल्याने त्या महिलेने गुन्हे शाखा 10 च्या कार्यालयात सागरची चौकशी केली असता, अशी कोणतीही व्यक्ती येथे नसल्याचे उत्तर मिळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने सागरविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी काल (ता. 13) मार्चला गोरेगाव येथील संजय गांधी सोसायटीजवळ सापळा रचून सागरला ताब्यात घेतले.

Web Title: marathi news mumbai news bogus police arrested crime