ठाण्यातील बोर्डीमध्ये मुख्य रस्ताच खड्डेमय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

बोर्डी : बोर्डी परिसरातील मुख्य मार्ग खड्डेमय झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांच्या खड्डे मुक्त महाराष्ट्र दावा फोल ठरला आहे. पावसाळ्यात झाई-बोर्डी मार्गे डहाणू कडे जाणाऱ्या रस्त्याची पार चाळण झाली होती. डिसेंबर पंधरा तारखे नंतर सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय घेतल्य नंतर दुरुस्ती करण्यात आली मात्र दुरुस्ती करताना लहान खडे दुरुस्ती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तसेच ओखी चक्रिवादळादरम्यान दोन दिवस झालेल्या पावसाने लहान खड्ड्याचे आकार मोठा झाल्याने रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत.

बोर्डी : बोर्डी परिसरातील मुख्य मार्ग खड्डेमय झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांच्या खड्डे मुक्त महाराष्ट्र दावा फोल ठरला आहे. पावसाळ्यात झाई-बोर्डी मार्गे डहाणू कडे जाणाऱ्या रस्त्याची पार चाळण झाली होती. डिसेंबर पंधरा तारखे नंतर सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय घेतल्य नंतर दुरुस्ती करण्यात आली मात्र दुरुस्ती करताना लहान खडे दुरुस्ती कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने तसेच ओखी चक्रिवादळादरम्यान दोन दिवस झालेल्या पावसाने लहान खड्ड्याचे आकार मोठा झाल्याने रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत. झाई बोर्डी मार्गावर सिध्दीविनायक पार्क, बोर्डी घोलवड मार्गावर विजय स्तंभ ते कामाधर्मशाळा, कँम्पिंग ग्राऊंड ते खूटखाडी पुल तसेच चावडी नाका येथे खड्डे पडल्याने वहान चालकांना कसरत करावी लागत आहे.

Web Title: Marathi news mumbai news bordi potholes on main road