छात्रभारतीचे विद्यार्थी जुहू पोलिस ठाण्यातून अज्ञात स्थळी

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई : विलेपार्ले येथे छात्रभारतीच्या नेत्यांना आणि विद्यार्थ्यांना काही तासांपूर्वी अटक करण्यात आलेली असून त्यातील काही विद्यार्थ्यांना जुहू पोलीस स्टेशनमधून अज्ञात स्थळी हलवलं असल्याचे छात्र भारतीच्या नेत्यांनी सांगितले. पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाब असल्याने ही धरपकड कारवाई झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुहू पोलीस स्टेशनाबाहेर छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे.

कोरेगाव भीमा प्रकरण आणि महाराष्ट्र बंदनंतर आज (गुरुवार) छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय छात्र संमेलन या जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील आणि छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. पण आता त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याचे कळते.

विलेपार्लेच्या भाईदास सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संमेलन होणार होते. संमेलनात मेवानी, खालीदसह लढाऊ विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्र भारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. दिवसभर चालणाऱ्या संमेलनात शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या कळीच्या प्रश्‍नांवर विचारमंथन होणार होते. पण, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारत या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांना अटक केली. पोलिसांनी याठिकाणी जमावबंदी लागू केली. 

Web Title: Marathi news mumbai news chatrabharti institution student and leaders move to unknown place