दीड हजार कोटींची फसवणूक; एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - तीन बॅंकांची दीड हजार कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे. फोरेवर प्रेशिअस ज्वेलरी ऍण्ड डायमंड लिमिटेडचे माजी संचालक एसएच हसमुख शाह याला अटक केली.

मुंबई - तीन बॅंकांची दीड हजार कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मे. फोरेवर प्रेशिअस ज्वेलरी ऍण्ड डायमंड लिमिटेडचे माजी संचालक एसएच हसमुख शाह याला अटक केली.

या प्रकरणातील आरोपी जतीन मेहताचा हा विश्‍वासू होता. मेहता हा कंपनीच्या हिऱ्यांची आयात-निर्यातीवर देखरेख करायचा. त्याशिवाय बॅंक व्यवहारही पाहायचा. मेहताला उद्या (ता. 12) न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. तीन बॅंकांची एक हजार 530 कोटी फसवणूक केल्या प्रकरणी सीबीआयने मुंबईतील दोन कंपन्यांविरोधात सहा गुन्हे दाखल केले होते. त्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

Web Title: marathi news mumbai news cheating crime