छगन भुजबळांना केईएममध्ये हलविले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंगळवारी उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयातून परळ येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांच्या वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे अहवाल आल्यावर भुजबळांच्या आजाराचे नेमके निदान होईल.

त्यानंतरच उपचाराची दिशा ठरेल. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर भुजबळ यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. भुजबळ यांना "पॅनक्रियाटायटिस'चा त्रास आहे. त्यावरील उपचारासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वादुपिंडाच्या नसेत रक्ताची गुठळी होणे, स्वादुपिंडाला सूज येणे आदी तक्रारींसोबत त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, श्‍वसनाचा त्रासही जाणवत होता.

Web Title: marathi news mumbai news chhagan bhujbal kem hospital