छगन भुजबळ म्हणाले, 'काळ्या गेंड्याला माझ्यासमोर आणू नका'!

गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई : 'या काळ्या गेंड्याला माझ्या समोर आणू नका. याच्यामुळेच माझ्यावर आज ही आफत ओढवली आहे', अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपला पुतण्या समीर भुजबळ याच्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. खटल्याच्या सुनावणीनिमित्त छगन भुजबळ व समीर भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी न्यायालयात आणण्यात आले होते.

न्यायालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी फावल्या वेळात छगन भुजबळ यांनी हा संताप व्यक्त केला. समीर अचानक दिसल्यामुळे भुजबळ यांनी आपल्या अंतर्मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.

काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. या काळात समीर भुजबळ यांनी छगन भुजबळ यांचे प्रतीमंत्री असल्याप्रमाणे कामे केली. 'अर्थपूर्ण' कामांमध्ये समीर चांगलेच तरबेज होते. त्यामुळे भुजबळांकडे कोणतेही खाते आले तरी समीर भुजबळ त्या खात्यात मलई नक्की कुठे आहे याचा अचूक तपास करायचे. एवढेच नव्हे तर, त्या खात्यात आपली यंत्रणा सक्रीय करून ते 'अर्थपूर्ण' कारभार करायचे.

मलिदा हडपण्याच्या वृत्तीमुळेच अनेक घोटाळ्यात स्वतः समीर भुजबळ अडकले व संबंधित खात्यांचे मंत्री असलेले छगन भुजबळ सुद्धा अडकले. गेले काही वर्षे छगन व समीर भुजबळ तुरूंगात आहेत. जामीन मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही भुजबळ काका – पुतण्यांची सुटका होत नाही. समीरमुळेच घोटाळे अंगलट आल्याची भावना छगन भुजबळ यांची झाली आहे. त्यामुळेच छगन भुजबळ हे समीर यांच्यावर कमालीचे नाराज आहेत. त्यातूनच संतापलेल्या छगन भुजबळ यांनी समीर यांचा 'काळा गेंडा' असा उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले.  

महाराष्ट्राच्या राजकारणातील बित्तंबातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आयुक्त मुंढेंच्या सुचना डावलत नेत्यांचे संशयास्पद अधिका-यांना संरक्षण?

औरंगाबाद :मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व शिवसैनिकांत हाणामारी

सरकार आहे का नाटक कंपनी ? : विखे पाटील 

Web Title: marathi news mumbai news Chhagan Bhujbal Sameer Bhujbal