तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

मुंबईतील कुलाबा येथून शनिवारी दुपारी 3 वाजता भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर "सीजी-803' टेहळणीसाठी मुरूड समुद्रकिनारी निघाले होते; मात्र काशीद येथे डोंगर पार करताना खाली कोसळू लागले. हेलिकॉप्टर काशीद समुद्रकिनारी उतरवण्याचा पायलटचा विचार होता. त्यानुसार हेलिकॉप्टरमधील सर्व जण लोकांना दूर होण्यास सांगत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. 

अलिबाग/नांदगाव : मुरूडमध्ये नांदगाव-कोळीवाड्यासमोर शनिवारी दुपारी 3 वाजता भारतीय तटरक्षक दलाचे "सीजी-803' हे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे खडकाळ भागात कोसळले. यात एक महिला गंभीर जखमी झाली. तिच्यासह अन्य तिघांना तातडीने मुंबईला हलवण्यात आले आहे. डेप्युटी कमांडर बलविंदर सिंह, पेनी चौधरी, पी. संदीप, बालजित सिंह अशी जखमींची नावे आहेत. 

मुंबईतील कुलाबा येथून शनिवारी दुपारी 3 वाजता भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर "सीजी-803' टेहळणीसाठी मुरूड समुद्रकिनारी निघाले होते; मात्र काशीद येथे डोंगर पार करताना खाली कोसळू लागले. हेलिकॉप्टर काशीद समुद्रकिनारी उतरवण्याचा पायलटचा विचार होता. त्यानुसार हेलिकॉप्टरमधील सर्व जण लोकांना दूर होण्यास सांगत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिली. 

दरम्यान, हेलिकॉप्टर पुन्हा हेलकावे खात नांदगाव-कोळीवाड्यासमोर खडकावर कोसळले. यात पायलटसह चौघे प्रवासी होते. खडकावर आदळल्याने हेलिकॉप्टरची एक बाजू कलंडली. त्यानंतर तिघे उड्या मारून बाहेर आले; मात्र यात पेनी चौधरी यांना उजव्या बाजूला वळलेल्या पंख्याचा जोरदार फटका हेल्मेटला बसला. या त्या बेशुद्ध झाल्या, अशी माहिती तटरक्षक दल सदस्य विशाल पाटील यांनी दिली. हेलिकॉप्टर खडकावर आदळल्याने पेट्रोलची गळती सुरू होती. 

मुरूड पोलिस आणि नौसेना दलाकडून मदत मिळाल्यानंतर महिलेला बाहेर काढले. सायंकाळी उशिरापर्यंत हेलिकॉप्टर खडकातून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी कोणतेही वाहन जाऊ शकत नसल्याने स्थानिकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचे काम सुरू होते, अशी माहिती मुरूड कोस्टगार्डतर्फे देण्यात आली. 

Web Title: Marathi News Mumbai News Coast Guard Helicopter Crash