भिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप 

Mumbai News Crime News accused arrested
Mumbai News Crime News accused arrested

नालासोपारा, ता. 17 (वार्ताहर) : विरार-अर्नाळा हद्दीत बोळींज परिसरात 2014 मध्ये एका गोणीमध्ये नग्नावस्थेत विहिरीत मृतदेह आढळला होता. पोलिसांना तपासादरम्यान हा मृतदेह एका भिकाऱ्याचा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. 

याप्रकरणी शुक्रवारी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विरार-बोळींज परिसरात मयत प्रवीण वाघ (वय 33) याला आरोपी गौतम परदेशी (32) व आरोपी राहुल जाधव (19) यांनी आपापसात संगनमत करून त्याच्या डोक्‍यात दगड घालून हत्या केली. त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला नग्नावस्थेत प्लास्टिकच्या गोणीत भरून विहिरीत फेकून दिले होते. या प्रकरणात अर्नाळा पोलिसांनी सबळ पुरावे जमा करत आरोपी गौतम परदेशी आणि राहुल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन्ही आरोपींना दोषी ठरवत त्यांना आजन्म कारावास आणि सहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com