दलितांवरील अत्याचार ही चिंतेची बाब : पाटकर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : देशभरात दलितांवर वाढत्या अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. दलित अत्याचार विरोधातील कायद्याची कडक अंमलबजावणी होत नाही, अशी खंत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. 

पवई आयआयटीच्या 'अभ्युदय' महोत्सवात पाटकर बोलत होत्या. त्यांनी सरकारी धोरणांवरही टीका केली. 'सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही.

सरकारने दिलेली आश्‍वासने आणि प्रत्यक्षात अमलात आणणे यात सरकार कमी पडत आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्या म्हणाल्या, ''सरदार सरोवरावरील पाण्याचा हक्क आम्ही कधीच सोडणार नाही. सरकारला एकत्र येऊन विरोध केला तर सरकारचे बळ कमी पडेल. जातीय मानसिकता वाढत चालली आहे. जातीयवाद हा समाजासाठी घातक आहे. समाजात सलोखा राखायचा असेल तर सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. मानवी हक्काचा पुरस्कार करण्यात आपण कमी पडत आहोत.'' 

या वेळी विद्यार्थ्यांशीही पाटकर यांनी संवाद साधला. 'इको फेमिनिझम' ही संकल्पना समाजमनात दृढ होत आहे. त्यानुसार, पर्यावरणाविषयी लढा देण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया पुढे येत आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचा आंदोलनातील सहभाग ही अभिमानास्पद असल्याचे पाटकर म्हणाल्या.

Web Title: marathi news Mumbai News Dalit Atrocity Megha Patkar