मुंबईत मनसेचे चित्रपट थिएटर मालकांना निवेदन  

Marathi News Mumbai News Deva Gacchi marathi movie manase
Marathi News Mumbai News Deva Gacchi marathi movie manase

मुंबई - डोंगरी येथील प्रिमियर गोल्ड सिनेमा गृहात धडक देत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या वतीने थिएटर व्यवस्थापकांना मराठी चित्रपटांना प्राइम टाइम दया. अन्यथा खळ्ळ खटटयाक होईल असा इशारा देत निवेदन देण्यात आले.

22 डिसेंबर 17 ला  'देवा' हा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याचा अथक प्रयत्न करूनही निर्मात्याला चित्रपट गृह उपलब्ध न झाल्याने त्यांची निराशा झाली,आणि नेमका हाच मुद्दा उचलून धरीत मनसेची अंगिकृत असलेली संघटना 'महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना' चित्रपटगृह मालकांना धडा शिकविण्यास पुढे सरसावली आहे.

यात महत्वाची बाब म्हणजे 22 डिसेंबरला सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांचा बहुचर्चीत सिनेमा 'टायगर ज़िंदा है' प्रदर्शित होतोय, त्याचमुळे या चित्रपटाच्या निर्मात्याने आपल्या नावाचा व बळाचा वापर करीत मुंबईतील सर्व मोक्याच्या चित्रपट गृहांवर कब्जा केलेला आहे. मग बाकी मराठी निर्माते करायचे काय? जायचे कोठे? असा सवाल मनसेने केला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com