मधुमेह दूर ठेवण्यासाठी तणामुक्त जीवन महत्त्वाचे  

मुरलीधर दळवी
बुधवार, 21 मार्च 2018

मुरबाड(ठाणे) - मुरबाड येथील कला गौरव संस्थे तर्फे आयोजित करण्यात आल्या व्याख्यान मालेत डॉ गजानन पाटील तणाव मुक्त जीवन या विषयावर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.

मुरबाड(ठाणे) - मुरबाड येथील कला गौरव संस्थे तर्फे आयोजित करण्यात आल्या व्याख्यान मालेत डॉ गजानन पाटील तणाव मुक्त जीवन या विषयावर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.

सध्या मधुमेह, रक्तदाब अनेक रुग्ण आपल्या आजूबाजूला दिसत असतात. याचे मुख्य कारण तणाव आहे. तणाव मुक्त जीवन जगायचे असेल तर आरोग्याच्या 'जी.एस.टी'ची अंमलबजावणी केलीच पाहिजे असे डॉ गजानन पाटील यांनी मुरबाड येथे बोलताना सांगितले. जी म्हणजे गर्व करू नका, एस म्हणजे शांततेत जीवन जगा आणि टी म्हणजे तणाव घेऊ नका या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली तर माणसापासून रोग दूर पळतात असे ते बोलताना म्हणाले. सत्ता, संपत्ती असेल व माणुसकी नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही असेही त्यांनी सांगितले. आपल्या आतला आवाज ऐकायला शिका, तसेच प्रेमाने वागा म्हणजे तुम्ही सुखी रहाल असे त्यांनी बोलताना आवर्जून सांगितले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड पंचायत समितीचे सदस्य अनिल देसले, जेष्ठ वकील आप्पासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मनोहर इसामे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे अध्यक्ष वि.वा.यशवंतराव यांनी तर आभार प्रदर्शन डी.के.खापरे यांनी केले.

Web Title: marathi news mumbai news diabetes tension free life