मुलांमधून एखादा कुंचल्याचा शागिर्द नक्कीच जन्माला येईल - खा. अरविंद सावंत

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 15 जानेवारी 2018

मुंबई : जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. 14) 'माझी मुंबई' या विषयावर महापौर आयोजित चित्रकला स्पर्धा दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील मनपाच्या सीताराम शेणॉय उद्यानात पार पडली. स्पर्धेकरिता 200 स्पर्धक विद्यार्थ्यांची उपस्थिती चित्रकलेची महती दर्शवित होती. 

मुंबई : जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. 14) 'माझी मुंबई' या विषयावर महापौर आयोजित चित्रकला स्पर्धा दक्षिण मुंबईतील डोंगरी येथील मनपाच्या सीताराम शेणॉय उद्यानात पार पडली. स्पर्धेकरिता 200 स्पर्धक विद्यार्थ्यांची उपस्थिती चित्रकलेची महती दर्शवित होती. 

दक्षिण मुंबईतील मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, गुजराती माध्यमातील विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेकरिता सकाळी आठ वाजताच हजर होते. स्पर्धक विद्यार्थ्यांचे स्वागत बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी गुलाब पुष्प देत केले. या समयी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची विशेष उपस्थिती पालक वर्गाचे लक्ष वेधून घेत होती. स्पर्धेसाठी उपस्थित विद्यार्थ्यांनी विषया अनुरूप चित्रे काढत रंगविली. खासदार सावंत यांचे एक अनोखे रूप या वेळी नागरिकांनी पाहिले. सावंत यांनी खासदारकीची झूल बाजूला ठेवत ते लहान मुलांमध्ये जाऊन बसले त्यांच्यात ते ही बालकांसमान रमले. त्यातील एका छकुलीला त्यांनी प्रेमाने उचूलन घेत तिला खेळविले. त्या वेळी त्यांच्यातील लहान मूल जागे झालेले सर्वांना पहावयास मिळाले. लहान पण देगा देवा! अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदी हावभाव दर्शवित होती. 

एक खासदार म्हणूनच नव्हे तर एक चित्रकलेचा हौशी विद्यार्थी म्हणून एका सामान्य माणसा सारखा येथे आलो आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांसमान जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार या पुढे आपल्याला पहायला मिळणार नाहीत परंतु या मुलांमधून एखादा कुंचल्याचा शागिर्द नक्कीच जन्माला येईल असे माझे प्रामाणिक मत आहे. असे या वेळी खा. सावंत म्हणाले. शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, मनपाचे वैद्यकीय अधिकारी विलास मोहोकर आणि शाळांचे शिक्षक, पालकवर्ग यांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

Web Title: Marathi news mumbai news drawing competition