नकली पोलिस निघाले 'बहुरूपी'

दिनेश चिलप मराठे 
रविवार, 31 डिसेंबर 2017

मुंबादेवी: येथील डोंगरी भात बाजार बिस्ती मोहल्ला येथे बहुरूपी समाजातील मनोरंजन करुन पोट भरणाऱ्या चार मध्यमवयीन तरुण खाकी कपडे परिधान करुन कलात्मक खेळ सादर केले. हा मुस्लिम बहुल इलाका असल्याने तेथील लोकांना बहुरूपी मनोरंजन हा काय प्रकार आहे हेच माहित नसल्याने संभ्रमावस्थेत या चारही तरुणांना येथील स्थानिक नागरिकांनी अडविले आणि त्यांना पकडून डोंगरी पोलिसांत दिले.  

चौकशी अंती ते चारजण 'बहुरूपी' निघाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. हा प्रकार आज दुपारी 3 वाजता डोंगरी पोलिस ठाण्यात घडला. या संदर्भात सर्व माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भागडीकर यांनी दिली. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता ते बहुरूपी भिवंडी फाटा (ठाणे) तसेच मध्यप्रदेश येथे राहतात असे समजले. तसेच त्यांच्या जवळील पिशवी तपासली असता त्यांचे जवळ आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. गरीब कुटुंबातील असल्याने त्यांचा व्यवसाय बहुरूपी खेळ करीत लोक मनोरंजन करुन हात पसरुन मिळेल त्या पैश्यावर पोट भरायचे हाच त्यांचा दिनक्रम असल्याने आज नेमके ते या ठिकाणी गेले आणि त्यांचेवर हा प्रसंग ओढवला. त्यांना आज उपनिरीक्षक सचिन पालवे यांनी 4 वाजता सोडले. त्यांची नावे मांगू हिन्दूनाथ व्यास, रमेश मांगूनाथ भाट, पप्पू भवरनाथ व्यास, भिमानाथ अडूनाथ पवार अशी आहेत. 

Web Title: Marathi News Mumbai news dupicate Police