कामावरुन काढलेल्या कामगारांना परत न घेतल्यास काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

उरण : उरण येथील द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल गोदामात काम करणाऱ्या 99 प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने कामावरुन कमी केले आहे. त्यांना 24 तासांच्या आत कामावर घेण्यात यावे; अन्यथा 12 फेब्रुवारीपासून सर्व 42 गोदामांमध्ये काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नोकरी व व्यवसाय बचाव समितीने गुरुवारी दिला. 

द्रोणागिरी नोडमधील एपीएम टर्मिनल गोदामात ओरियन्ट फ्रेट सर्व्हिस नामक कंत्राटदाराने 99 प्रकल्पग्रस्तांना घरचा रस्ता दाखविला. कंपनीच्या गेटवर तशी यादीच कंत्राटदार जमशेद अश्रफ यांनी लावल्याने कामगारांनी तातडीने या ठिकाणी आंदोलन सुरू केले. या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली बचाव समितीने उरण तालुक्‍यातील सर्व 42 कंटेनर यार्डमधील कामगार प्रतिनिधींची बैठक आज बोलावली. या बैठकीला कामगार नेते श्‍याम म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, कर्नाळा स्पोर्टचे उपाध्यक्ष रवी पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त रवींन्द्र पाटील, जेएनपीटीचे माजी विश्वस्त भूषण पाटील, कामगार नेते एम.टी.घरत, कामगार नेते के.सी.पारेख यांच्यासह विविध कामगार संघटनाचे प्रतिनिधी, कामगार व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सभेत माजी आमदार विवेक पाटील यांनी येत्या सोमवारपासून सर्व गोदामांमधील कामगार कामावर जातील. मात्र ते काम करणार नसल्याची भूमिका मांडली.

Web Title: Marathi news mumbai news employees work agitation