पायांना जखमा अन्‌ उन्हामुळे डिहायड्रेशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - विविध मागण्यांसाठी नाशिकहून तब्बल सात दिवस पायपीट करून मुंबई गाठलेल्या शेतकऱ्यांच्या पायांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या. अनेकांना उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास झाला. मोर्चेकऱ्यांवर उपचार करण्यासाठी आझाद मैदानात आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली होती. येथे सुमारे 700 मोर्चेकऱ्यांची तपासणी करण्यात आली.

आझाद मैदान येथे ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांमध्ये सोमवारी (ता. 12) सकाळपासून सुमारे 500 रुग्णांची तपासणी करण्यात आली; तर जे. जे. रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत सुमारे 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. संजय वाठोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारांसाठी आलेल्या अनेक रुग्णांच्या पायाला जखमा होत्या. अंगदुखी, पायाला जखमा आणि डिहायड्रेशनचा त्रास झालेले रुग्ण सर्वाधिक होते. काही रुग्णांना जुन्या आजारांचा त्रास होता. अनेक रुग्णांना रक्तदाब आणि दम्याचा त्रास असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

Web Title: marathi news Mumbai News Farmer Long March summer farmer injured