कर्जमाफीसाठी 26 लाख 72 हजार ऑनलाईन अर्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 27 ऑगस्ट 2017

या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर असून या मुदतीच्या आत शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा मोफत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मुंबई : शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू असून, आज 26 ऑगस्टला दुपारी 4 वाजेपर्यंत 32 लाख 8 हजार शेतकऱ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली. त्यात 26 लाख 72 हजार 857 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

देशमुख यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. आपले सरकार केंद्र, नागरी सुविधा केंद्र, संग्राम केंद्र आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील केंद्रांचा समावेश आहे.

या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर असून या मुदतीच्या आत शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा मोफत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: marathi news mumbai news farmers loan waiver Devendra Fadnavis