कफ परेड येथील सागरी भरावास मच्छिमारांचा मोठा विरोध

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 12 जुलै 2017

कफ परेड येथील मच्छिमारांच्या कुटुंबियाना थिमपार्क, बोट क्‍लब आणि सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली पद्धतशीरपणे उध्वस्त करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा डाव प्रखर विरोधाने हाणून पाडू, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या दामोदर तांडेल यांनी पत्रपरिषदेत दिला आहे.

मुंबादेवी - कफ परेड येथील मच्छिमारांच्या कुटुंबियाना थिमपार्क, बोट क्‍लब आणि सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली पद्धतशीरपणे उध्वस्त करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा डाव प्रखर विरोधाने हाणून पाडू, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या दामोदर तांडेल यांनी पत्रपरिषदेत दिला आहे.

पत्रकारपरिषदेत बोलताना तांडेल म्हणाले, "कफ परेड बंदरात 300 एकरवर भराव घालायचा आहे. त्यासाठी मेट्रो रेल्वे मार्गाच्या उत्खननातून मिळणारी माती येथे भरावासाठी वापरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. येथे सामाजिक वनीकरणाच्या गोंडस नावाखाली मेट्रोमुळे उध्वस्त झालेली झाडे त्यांना येथे लावायची आहेत. मग महालक्ष्मी रेसकोर्सवर 250 हेक्‍टर जागा पडून आहे, तेथे त्यांनी उभारावे. कफ परेड बंदरामुळे 2 हजार घरांतील जवळपास 20 हजार लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. कफ परेड येथील सागरी भरावास मच्छिमारांचा प्रचंड विरोध असून कोळ्यांना उध्वस्त करण्याचा सरकारचा कुटील डाव आहे. धनिकांसाठी थीम पार्क बोटक्‍लब निर्माण करण्यासाठी 300 एकरात भराव टाकल्यास मच्छिमार तो उध्वस्त करतील. या थीम पार्क साठी भराव केल्यामुळे आंबेडकर नगर, मूर्ती नगर, गीता नगर आदी वसाहती उठवून त्यांना उरण व मोरा येथे बंदर बॉंधून स्थलांतर करायचे आहे. दामोदर तांडेल पर्यटनाच्या नावाखाली पर्यावर्णाचा ह्रास करुन मुंबई उध्वस्त करणाऱ्या सरकार विरोधात आम्ही उग्र आंदोलन करुन प्रकल्प हाणुन पाडू, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्या बरोबरच राष्ट्रीय हरीत आयोगाकडे दाद मागण्यात येईल.'

Web Title: marathi news mumbai news fisherman news