पालघर: लग्न समारंभात अन्नातून विषबाधा

प्रमोद पाटील/ नीरज राऊत
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

माकुणसार येथील एका वधूच्या लग्न समारंभात माहीम येथील वर लग्नासाठी आले असता दुपारच्या भोजनात गाजर हलवा व पनीर ची भाजी खाल्याने सायंकाळ नंतर अनेकांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तसेच बरयाच जणांना उलटी होऊ लागली. साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास 80 रुग्णांना सफाळे येथील प्राथमिक व खासगी  रूग्णालयात, 35 रुग्णांना माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 30 रुग्णांना पालघर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना अन्नातून त्यांना विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

पालघर : पालघर तालुक्यातील माकुणसार येथील रविवारी (18) लग्न समारंभात अन्नातून दीडशे लोकांपेक्षा अधिक लोकांना विषबाधा झाली असून रूग्णांना सरकारी व खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. 

यापैकी अधिकतर रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्याना देखरेखीसाठी पालघर ग्रामीण रुग्णालय, सफाळे व माहीम प्राथमिक रुग्णालय व खासगी रुग्णालयायात दाखल कंरण्यात आले आहे.

माकुणसार येथील एका वधूच्या लग्न समारंभात माहीम येथील वर लग्नासाठी आले असता दुपारच्या भोजनात गाजर हलवा व पनीर ची भाजी खाल्याने सायंकाळ नंतर अनेकांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. तसेच बरयाच जणांना उलटी होऊ लागली. साधारण संध्याकाळी पाचच्या सुमारास 80 रुग्णांना सफाळे येथील प्राथमिक व खासगी  रूग्णालयात, 35 रुग्णांना माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर 30 रुग्णांना पालघर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना अन्नातून त्यांना विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

सर्व रूग्णांना डाॅकटरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू ठेवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आले. या पैकी काही रुग्णांना सलाइन द्वारे उपचार सुरू करण्यात आले आहे. मकूणसारच्या लग्नात स्थानिकांनी जेवण तयार केले होते अशी माहिती आली असून या लग्नाचे सुमारे 300 नागरिकांनी जेवल्याची माहिती पुढे आली आहे.

ही घटना समजताच पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे सभापती दामोदर पाटील यांनी रूग्णालयात जाऊन रूग्णांची चौकशी करून रूग्णांना योग्य उपचार सुरू असल्याची  खात्री करुन घेतली. 

Web Title: Marathi news Mumbai news food poisoning in Palghar