परदेश सहलीच्या आमिषाने लाखोंचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

प्रख्यात "केसरी टूर्स'च्या उपकंपनीतर्फे परदेशी सहलीसाठी सवलतीचे आमिष दाखवत पैसे घेऊन बनावट पावत्या देत अपहार झाल्याचे उघड झाले आहे. पर्यटकांनी दिलेली रक्कम मूळ कंपनीकडे भरली नसल्याने सहलीसाठी जाताच आले नाही.

ठाणे : प्रख्यात "केसरी टूर्स'च्या उपकंपनीतर्फे परदेशी सहलीसाठी सवलतीचे आमिष दाखवत पैसे घेऊन बनावट पावत्या देत अपहार झाल्याचे उघड झाले आहे. पर्यटकांनी दिलेली रक्कम मूळ कंपनीकडे भरली नसल्याने सहलीसाठी जाताच आले नाही. याप्रकरणी लाखोंची फसवणूक झाल्याची तक्रार चितळसर पोलिसांत दाखल झाली आहे. 

हिरानंदानी मेडोजमधील एमराल्ड प्लाझामधील "ब्ल्यू ओशन' या पर्यटक कंपनीत सृष्टी गोठणकर ही कर्मचारी आहे. 2014 पासून आतापर्यंत "वर्ल्ड टूर'साठी ठाण्यातील 23 पर्यटकांची बुकिंग केली होती. रोखीने बुकिंग केल्यास सवलत देण्याचे आमिष दाखवल्याने या पर्यटकांनी 57 लाख 80 हजारांची रक्कम रोखीने भरली; मात्र ही रक्कम "केसरी टुर्स'कडे भरली नसल्याने टूर झाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रभाकर शिरोडकर या पर्यटकाने ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार संबंधित कंपनी आणि महिलेविरोधात चितळसर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.  

 
 

Web Title: Marathi News Mumbai News Foreign Trip Fraud Lakh