महिला अधिकाऱ्याकडूनच महावितरण विभागाची फसवणूक 

रविंद्र खरात
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कल्याण : राज्यातील महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मुख्यालयात कामकाज करावे तसे न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते, मात्र त्यांचे आदेश धाब्यावर बसवून महावितरण कल्याण विभागाची एक महिला अधिकारी आपल्याच विभागाची फसवणूक करत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले असून संबंधित महिला अधिकारी वर्गावर कडक कारवाई करण्याची मागणी कल्याण मधील जागरूक नागरीक आशिष चांदेकर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण विभागात शिस्त आणण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने आपल्याला ज्या ज्या विभागात नेमणूक केली आहे, तेथे काम करावे. जे आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करून 

त्यांचे घरभाडे थांबविण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार महावितरणच्या मुंबई मधील प्रकाशगड येथील मुख्य कार्यालयामधून प्रशासकीय परिपत्रक काढून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने मुख्यालयात राहण्याचे आदेश दिले होते. मात्र महावितरण कल्याण परिमंडळातील सहाय्यक महाव्यवस्थापक पदावर असलेल्या हविषा जगताप या नियम धाब्यावर बसवून त्या मुख्यालयात राहत नसल्याचे जागरूक नागरीक आशिष चांदेकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहिती मधून उघड झाले असून ते वरिष्ठ अधिकारी वर्गाला खोटी माहिती देत सुविधा घेत असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे. 

राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार महावितरणाच्या कल्याण परिमंडळात न राहणाऱ्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे शिस्तभंग आणि घरभाडे बंद करण्याची कारवाई सहाय्यक महाव्यवस्थापक हविषा जगताप यांनी केली. मात्र स्वतः विभागाची फसवणूक करून मुख्यालयामध्ये न राहता सुविधा घेत असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले असून संबंधित फसवणूक करणाऱ्या महिला अधिकारी वर्गावर कठोर कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरीक आशिष चांदेकर यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असून त्या महिला अधिकारीवर काय कारवाई होते याकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे .

Web Title: Marathi news mumbai news fraud in mseb office by female officer