पदवीधर मतदारसंघातील 18 उमेदवारांचे अर्ज मागे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होऊ लागली आहे. अर्ज मागे घेण्याचा आजचा (ता. 12) शेवटचा दिवस होता. 18 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाने दिली. पदवीधर मतदारसंघासाठी गुरुवारपर्यंत 130 अर्ज दाखल झाले होते. खुल्या गटासाठी 69, ओबीसी गटातून 13, एससी गटातून 25, एसटी गटातून 6, डीटीएनटी गटातून 8 आणि महिलांच्या गटातून 9 अर्ज आल्याचे समजते. या गटांतील नेमक्‍या कोणत्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, हे समजू शकले नाही. दरम्यान, सोमवारी मुंबई विभागीय कॉंग्रेस समितीतर्फे सिनेट पदवीधर मतदारसंघातील सहा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. खुल्या गटातून माजी सिनेट सदस्य संजय वैराळ, अश्‍विनी पवार, शैलेश देशपांडे, सूचित सावंत; तर अनुसूचित जाती गटातून शासकीय आणि अनुसूचित वसतिगृहातून निरीक्षण समितीचे माजी सदस्य विद्याधर जांभोरीकर, इतर मागासवर्गीय गटातून डॉ. सचिन मांडलिक यांनी अर्ज भरला आहे.
Web Title: marathi news mumbai news graduate constituency election