डोंबिवली - ‘हास्यदर्शन2018’चे उद्घाटन राजेंद्र देवळेकरांच्या हस्ते

संजीत वायंगणकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

डोंबिवली : व्यंगचित्रकार हा समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतो. त्यामुळे समाजातील व्यंग म्हणजेच कमतरता दूर करणे शक्य होते. असे प्रतिपादन महापौर राजेंद्र देवळेकर यांनी ‘हास्यदर्शन2018’ च्या उद्घाटन प्रसंगी केले. ते म्हणाले ‘सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ‘यांनी नाव दिलेली कार्टुनिस्टस् कंबाईन ही संस्था आजही हे काम नेटाने पुढे नेत आहे. तसेच शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठान यांनी असेच सामाजिक व संस्कृतिक कार्यक्रम यापुढेही राबवावेत.

शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठान व कार्टुनिस्टस् कंबाईन यांच्या संयुक्त माध्यमातून डोंबिवलीतील आनंद बालभवन, येथे भरवण्यात आलेल्या “हास्यादर्शन 2018” चे उद्घाटन शुक्रवारी कल्याण डोंबिवलीचे प्रथम नागरिक महापौर राजेंद्र देवळेकर व स्थायी समिती सभापती राहुल दामले यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख  राजेश मोरे, कल्याण ग्रामीण महिला संघटक कविता गावंड, कार्टुनिस्टस् कंबाईनचे अध्यक्ष विवेक मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसंस्कृती युवा प्रतिष्ठान तर्फे दिंडोरी लोकसभा व नाशिक ग्रामीणचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.

हास्यदर्शन 2018 मध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांनी राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, संस्कृती या विषयावरील काढलेल्या मार्मिक, मिश्कील व दुर्मिळ अश्या 250 हास्यचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांनी साठच्या दशकात काढलेली  दुर्मिळ रंगीत चित्रे तसेच   मंगेश तेंडूलकर , शी. द. फडणीस,  वसंत सरवटे,  विवेक मेहेत्रे,  गणेश जोशी,  प्रशांत कुलकर्णी अश्या नामवंत कलाकारांची व्यंगचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.ती पहाण्याची डोंबिवलीकरांना सुवर्ण संधी रविवार पर्यंत आहे.(

Web Title: Marathi news mumbai news hasya darshan 2018 inauguration