आकस्मित हृदयविकारावर पालिकेचे रामबाण आरोग्ययंत्र : जयस्वाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

ही यंत्रे शहरात सार्वजनिक ठिकाणी, आरोग्य केंद्रे, बस डेपो, रेल्वेस्थानके आदी ठिकाणी लावणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास त्यांच्या उपचारासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते; पण या उपकरणामुळे संबंधित रुग्णांवर पुढील उपचारासाठी काही कालावधी उपलब्ध होणार आहे. 

ठाणे : सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास अशा व्यक्तींचा प्राण वाचविण्यास मदत करणारी डिफिब्रिलेटर यंत्रणा शहराच्या विविध भागांत बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. हे आरोग्ययंत्र लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच असा प्रयोग राबविला जाणार आहे.
 
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे आणि क्रिटिकल मेडिकलचे अनिल छुगांनी यांनी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी आरोग्ययंत्राचे प्रात्यक्षिक दाखवले. सार्वजनिक ठिकाणी अचानक एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका (कार्डियाक रेस्ट) आल्यास या डिफिब्रिलेटर यंत्राद्वारे छातीच्या विशिष्ट भागात दोन स्टीकर्स लावून यंत्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीला समप्रमाणात शॉक ट्रीटमेंट दिली जाते. या ट्रीटमेंटमुळे दोन ते तीन मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्‍यावर नियंत्रण मिळवून त्या व्यक्तीचा प्राण वाचण्यास मदत होते. विशेष म्हणजे, हे यंत्र हाताळण्यासाठी डॉक्‍टरांची किंवा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची आवश्‍यकता नाही. कोणत्याही व्यक्तीला प्रशिक्षण दिल्यास ती व्यक्ती हे यंत्र योग्यरीत्या हाताळू शकते.

ही यंत्रे शहरात सार्वजनिक ठिकाणी, आरोग्य केंद्रे, बस डेपो, रेल्वेस्थानके आदी ठिकाणी लावणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी एखाद्याला हृदयविकाराचा त्रास झाल्यास त्यांच्या उपचारासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते; पण या उपकरणामुळे संबंधित रुग्णांवर पुढील उपचारासाठी काही कालावधी उपलब्ध होणार आहे. 

डिफिब्रिलेटर यंत्रणेबाबत माहिती 

एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यावर डिफिब्रिलेटर यंत्राद्वारे त्यांच्या छातीच्या विशिष्ट भागात दोन स्टीकर्स लावले जातात. या यंत्राच्या माध्यमातून त्या व्यक्तीला समप्रमाणात शॉक ट्रीटमेंट देण्यात येते. या ट्रीटमेंटमुळे दोन ते तीन मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्‍यावर नियंत्रण मिळविता येते. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. कोणत्याही व्यक्तीला प्रशिक्षण दिल्यास ती व्यक्ती हे यंत्र सहजरीत्या हाताळू शकते. 

Web Title: Marathi News Mumbai News Heart Attack Thane News sanjiv jayswal